क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ

Share This
मुंबई - औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाचे मोठे आव्हान मुंबईसमोर आहे. खासगी डॉक्‍टरांकडून वेळीच निदान होत नसल्यामुळे अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले. 

पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या क्षयरोग तपासणीच्या शिबिरामध्ये मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात सल्लागार असणाऱ्या डॉ. अरुण बामणे यांनी ही बाब मान्य केली आहे. बामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये दर वर्षी 30 हजारांहून अधिक क्षयरुग्णांमध्ये ड्रग सेन्सिटिव्हिटी आढळते. 

काही खासगी डॉक्‍टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, भारतात बंदी असलेली औषधेही क्षयरुग्णांना देण्यात येतात. अनुभव नसलेल्या किंवा विशिष्ट हितसंबंध जपण्यासाठी काही डॉक्‍टरांकडून असे प्रकार करण्यात येत आहेत. काही वेळा चुकीच्या प्रमाणात औषधे रुग्णांना देण्यात येतात. काही वेळा चुकीचे औषधांचे कॉम्बिनेशन रुग्णांना देण्यात येते. परिणामी रुग्णांचा क्षय बरा होण्याऐवजी तो वाढतो. त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो. परिणामी रुग्णाला औषध लागू पडत नाही. काही जणांमध्ये तर अशा औषधांमुळे ऍलर्जी होते; तर काही जणांचा आजार बळावतो.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages