पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2014

पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत संपूर्ण मुंबईत आज पालिकेने विविध संस्थांच्या मदतीने अभियान राबवले. त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या सहकार्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी कचरानिर्मितीपासून ते कचरा विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणापर्यंत ही मोहीम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

मुंबई महापालिका तसेच मुंबई दूरदर्शन यांच्या वतीने गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात वरळी येथील दूरदर्शन केंद्रात थेट प्रक्षेपणाद्वारे झाली. या वेळी आयुक्त कुंटे यांनी वरील निर्धार बोलून दाखवला. स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची गरज असून, त्यासाठी महाविद्यालये, सोसायट्या, झोपडपट्ट्या, विविध कार्यालये येथील नागरिकांना या अभियानात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पुढील पाच वर्षांपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad