मुंबई : माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळ क्र. ०४ मध्ये आज सायंकाळी आग लागून त्यात ४ महिलांसह ६ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळ क्र. ०४ च्या दुसर्या मजल्यावर एका खोलीत सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अचनक आग लागली. हि आग तत्काळ भडकल्याने बाजूच्या ३ घरांनाही आग लागली. त्यामुळे तेथील रहिवाश्यांमध्ये एकाच खळबळ उडाली. यावेळी भयभीत झालेल्या रहिवाश्यांनी इमारती बाहेर धाव घेतली. तर काहींनी वरच्या मजल्यावरून उड्या मारल्या. या घटनेची माहिती मिळताच ४ फायर इंजिन ४ वाटर टंकर व अम्बुलन्स सह अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन ६ वाजून ४० मिनिटांनी हि आग आटोक्यात आणली.
Post Top Ad
02 October 2014
Home
Unlabelled
माझगाव बीआयटी येथील आगीत सहाजण जखमी
माझगाव बीआयटी येथील आगीत सहाजण जखमी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

