चित्रपट विकास महामंडळाच्या एकूण 23 एकर जागेवर अतिक्रमण झाल्याचे आनंद पारगावकर यांनी मिळवलेल्या माहिती अधिकारातुंन उघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची 521 एकर 38 गुंठे इतकी जमींन महाराष्ट्र फिल्म्स स्टेज आणि कल्चरल डेवलपमेंट महामंडळाच्या ताब्यात आहे. यापैकी गौतम नगर, माळी नगर, हबाले पाडा, मोरांचा पाडा, मद्रास पाडा, नागमोडी पाडा व् देवीचा पाडा या भूखंडा वर 23 एकर जागेवर 2566 अनधिकृत झोपड्या बांधण्यात आलेल्या आहेत. या भूखंडावर कधी पासून अतिक्रमण झाले ही माहिती महामंडळाने दिली नसली तरी अतिक्रमणाबाबत वेळोवेळी उप जिल्हाधिकारी निष्कासन याना कळविले असून सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.
Home
Unlabelled
चित्रपट विकास महामंडळाच्या भुखंडावर अतिक्रमण
चित्रपट विकास महामंडळाच्या भुखंडावर अतिक्रमण
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.
