लोकलमध्ये आता स्ट्रेचर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकलमध्ये आता स्ट्रेचर

Share This
मुंबई : उपनगरीय लोकल ही मुंबईकरांची लाईफलाइन असली तरी या लाईफलाइनच्या धडकेने आणि प्रवास करत असताना होणार्‍या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आता लोकल ट्रेनमध्येच स्ट्रेचरची सोय उपलब्ध करून दिली आहे. मरेच्या एका लोकलमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रेचर बसवण्यात आले आहे.

उपनगरीय लोकलला दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि या गर्दीत प्रवास करत असताना लोकलमधून पडणार्‍या प्रवाशांच्या अपघातांची संख्या दररोज वाढते आहे. दररोज सुमारे १0 ते ११ प्रवासी उपनगरीय रेल्वेच्या अपघातांमध्ये मरण पावतात. अनेकदा अपघात झाल्यानंतर त्या जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यासाठी त्वरित स्ट्रेचरची व्यवस्था नसते. त्यामुळे त्या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागतो. मध्य रेल्वे प्रशासनाने यावर नामी उपाय करत लोकलच्या सेकंड क्लासच्या डब्यातच एक ा सीटचे रूपांतर स्ट्रेचरमध्ये केले आहे. प्रवाशांना ही बसण्याची सीट वाटत असली तरी मुळात ते स्ट्रेचर आहे. त्याला दोन्ही बाजूने कड्या असून त्या आतल्या बाजूने लावण्यात आल्या आहेत. 

अपघातप्रसंगी त्या कड्या काढून ती सीट काढल्यास त्याचा स्ट्रेचर होतो. सध्या मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर फक्त एकाच लोकलच्या सेकंड क्लासमध्ये हे स्ट्रेचर लावले आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांच्या कल्पनेतून ही योजना राबवण्यात आली आहे. सीटचेच स्ट्रेचर बनवण्यात आले असल्यामुळे चोरट्यांना ते चोरताही येणार नाहीत. येत्या काही महिन्यांमध्ये उपनगरीय रेल्वेच्या ४ लोकलमधील सेकंड क्लासच्या (पुरुषांच्या) डब्यांमध्ये प्रत्येकी २ अशी ८ स्ट्रेचर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलच्या अपघातांमध्ये जखमी होणार्‍या प्रवाशांना वैद्यकीय मदत तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages