पालिकेच्या लेखा विभागाच्या हिशोबात ११ हजार कोटी रुपयांचा घोळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या लेखा विभागाच्या हिशोबात ११ हजार कोटी रुपयांचा घोळ

Share This
मुंबई : पालिकेच्या लेखा विभागाच्या हिशोबात तब्बल ११ हजार कोटी रुपयांचा घोळ आणि अनियमितता असल्याचे उघडकीस आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत लेखा विभागाच्या या कथीत गैरप्रकाराबद्दल दिली. २00७-१४ या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण सुरू आहे. यामध्ये हा घोळ झाल्याचा दावा देशपांडे यांनी केला. लेखा विभागाकडे पालिकेची किती रक्कम शिल्लक आहे, अशी माहिती विचारण्यात आली. त्या वेळी ४३७ कोटी रोख रक्कम असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही रक्कम कुठे आहे, अशी विचारणा केली असता पािलका प्रशासनाने घुमजाव करून ती धनादेश असल्याचे सांगितले. या रकमेचा तपशील मागितला असता, पालिकेला त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे लेखा विभागात घोळ असल्याचा संशय देशपांडे यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages