मुंबई : नवर्याच्या जीवावर निवडून येणार्यांनी आम्हाला शिकवू नये, असे बुधवारी पालिकेच्या महासभेत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केलेले वादग्रस्त वाक्य त्यांना चांगलेच महागात पडले. महिला लोक आयोगाने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन, त्याचा निषेधही केला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी महापौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना भेटून याविषयी निवेदन दिले. याबद्दल आयोगाने देशपांडे यांच्याकडे खुलासा मागितला आहे. आयोगाच्या मुंबई अध्यक्षा रचना अग्रवाल यांनी याविषयी सांगितले, अळवणी यांच्याबद्दल देशपांडे यांनी केलेले वक्तव्य हे सर्व महिला नगरसेवकांचे, स्त्री वर्गाचे खच्चीकरण करणारे आहे. मतदार हे आपले मत महिला उमेदवार कोणाची पत्नी आहे हे पाहून मत देत नाहीत. त्या महिला उमेदवाराचे काम बघून मते देत नाहीत हे बहुधा महिलांना कमी लेखणार्या अशा पुरुषीवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना ठाऊक नसावे. अशा पुरुषीवृत्तीच्या व्यक्तीस केवळ तोंडी माफी क्षमस्व नाही, असे त्या म्हणाल्या.
Post Top Ad
28 November 2014

Home
Unlabelled
देशपांडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल
देशपांडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल
Post Bottom Ad
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.