डेंग्यू-मलेरिया आजाराला महामारी घोषित करा - उच्च न्यायालयात याचिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डेंग्यू-मलेरिया आजाराला महामारी घोषित करा - उच्च न्यायालयात याचिका

Share This
मुंबई : मुंबई उपनगरासह संपूर्ण राज्यभरात थैमान घातलेल्या डेंग्यू-मलेरिया आजाराला महामारी घोषित करा तसेच हे आजार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणार्‍या जनहित याचिकेची सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर २0 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे मुख्य न्यायमूर्ती मोहीत शाह आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने निश्‍चित केले आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सांगलीसह संपूर्ण राज्यभरात मोठय़ा प्रमाणात डेंग्यू आणि मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत अडीचशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे तर हजारो डेंग्यूग्रस्त रुग्णालयात दाखल आहेत. शासकीय तसेच पालिका प्रशासासनाने हे आजार रोखण्यासाठी वेळीच पाऊले न उचलल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, असा दावा गवळी यांनी केला आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली नाही म्हणून गवळी यांनी खंडपीठाला याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार, खंडपीठाने २0 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages