मुंबईत इतर आजारांचे प्रमाणही वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत इतर आजारांचे प्रमाणही वाढले

Share This
मुंबईत डेंग्यूचा फैलाव झाला असतानाच मुंबईत ताप आणि गतवर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत मलेरियाचे एक हजार ५९ रुग्ण आढळले होते, तर यंदा मलेरियाचे एक हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत १0५ रुग्ण जास्त आढळले आहेत. तापाचे गेल्या ऑक्टोबरमध्ये १0 हजार ८४१ रुग्ण आढळले असून यंदा १३ हजार २१४ रुग्ण आढळले. तापाच्या रुग्णांच्या संख्येत दोन हजार ३७३ रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे ११, डेंग्यूचे १८९, स्वाईन फ्ल्यूचे १३, गॅस्ट्रोचे ८२१, टायफॉईडचे १७५, काविळीचे १५८, कॉलराचा एक रुग्ण आढळला होता. यंदा ऑक्टोबरमध्ये लेप्टोचे पाच, डेंग्यूचे २१३, गॅस्ट्रोचे ८0९, टायफॉईडचे १७६, काविळीचे १७८, चिकनगुनियाचा एक, कॉलर्‍याचे दोन रुग्ण आढळले आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages