डेंग्यू - नागरिकांच्या मदतीसाठी २४११४000 ही हेल्पलाइन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डेंग्यू - नागरिकांच्या मदतीसाठी २४११४000 ही हेल्पलाइन

Share This
मुंबई : मुंबईत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीमुळे पालिकेची झोप उडाली आहे. विरोधक आणि प्रसारमाध्यमांमधून डेंग्यूबाबत तीव्र पडसाद उमटल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत महापौर निवासस्थानी बुधवारी सायंकाळी आपत्कालीन बैठक बोलावली. यावेळी डेंग्यूमुक्त मुंबईसाठी मुंबईकरांनी घर व परिसराची स्वच्छता राखण्याला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांसमोर डेंग्यू आजारासंदर्भात संगणकीय सादरीकरण करण्यात आले. २0१0 मध्ये मुंबईत हिवताप (मलेरिया) या आजाराचा प्रादुर्भाव वाढला होता. त्या वेळी महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर जनजागृती केली. लोकांच्या सहभागातून आजारांना रोखणे शक्य आहे, हे जनतेला पटवून दिले, महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी मोठय़ा प्रमाणावर क्षेत्रीय भेटी दिल्या तसेच उपाययोजनांना गती दिली. त्याच धर्तीवर आताही महापालिकेने या सर्व बाबींचे अनुकरण करावे, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. नागरिकांच्या मदतीसाठी २४११४000 या क्रमांकावर ही हेल्पलाइन सुरू केली आहे, असे या वेळी सांगण्यात आले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages