काश्मीर पूरग्रस्तांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे दहा लाखांची मदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काश्मीर पूरग्रस्तांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे दहा लाखांची मदत

Share This
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन दहा लाख रुपयांचाधनादेशपंतप्रधानसहायताोषासाठी कुलपतींकडे सुपूर्त केला.

'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या पाठिशी एकजुटीने उभे रहा आणि या संकटसमयी त्यांना मदत करण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रयत्नांचा भाग बना' असे आवाहन देशवासियांना केले होते. त्यास अनुसरून आज सोमवारीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनीविद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांची राजभवनमध्ये भेट घेऊनजम्मू-काश्मीरमधीलपूरग्रस्तांसाठी दहा लाख रुपयांच्यानिधीचा धनादेशपंतप्रधानसहायता निधी म्हणून राज्यपालांकडे सुपूर्त केला. मुक्त विद्यापीठाच्या या योगदानाचे कुलपतींनी स्वागत केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages