रेल्वेमधील हत्येच्या घटनांत चौपटीने वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेमधील हत्येच्या घटनांत चौपटीने वाढ

Share This
मुंबई : एकीकडे उपनगरी लोकल ही 'मुंबईकरांची जीवनवाहिनी' मानली जाते; पण सध्या याच जीवनवाहिनीतून प्रवास करताना मुंबईकरांची धडधड वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीतून प्रवास करणे एक प्रकारचे आव्हान बनले असताना, या मार्गावर गुन्हेगारीचा टक्काही वाढत चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लोकलमध्ये घडलेल्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण चौपटीने अधिक असल्याचे रेल्वे पोलिसांकडील (जीआरपी) आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 
गेल्या वर्षभरात रेल्वे पोलिसांकडे हत्येच्या ४ प्रकरणांची नोंद झाली. यंदा ऑक्टोबरपर्यंत हा आकडा १५वर पोहोचला आहे. तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी लोकलमध्ये ४१ जणींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आले होते. यंदा ऑक्टोबरपर्यंत विनयभंगाच्या ४३ घटनांची नोंद झाली आहे. लोकल प्रवासातील गुन्हेगारीचा हा वाढता टक्का प्रवाशांत असुरक्षिततेची भावना निर्माण करू लागला आहे. लोकलमध्ये हत्येच्या घटनांचे प्रमाण वाढण्यामागे विविध कारणे असावीत, असे मत सेवानवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. वडमारे यांनी व्यक्त केले. मुंबईची लोकसंख्या दिवसागणिक वाढतीच आहे; परंतु त्या तुलनेत जीआरपींच्या जवानांची संख्या अपुरी आहे. त्याशिवाय जीआरपीतील अधिकार्‍यांना तांत्रिकदृष्ट्याही मदत मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे वडमारे यांनी लक्ष वेधले आहे. जीआरपीचे आयुक्त रवींद्र सिंघल यांनी लोकलमध्ये हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढल्याचे मान्य केले.; पण त्यामागे विशिष्ट कारणे नसल्याचे ते म्हणाले.
गुन्ह्यांची संख्या (२0१४)
हत्या - १५
सोनसाखळी चोरी - ६0
विनयभंग - ४३
पाकिटमारी - ५९३
बॅग चोरी - १७२
दंगल - ७
हल्ला - २९

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages