गाडी सुटल्यानंतरही तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2014

गाडी सुटल्यानंतरही तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) - रेल्वे प्रवाशांना खुशखबर आहे. तुमची गाडी काही कारणाने सुटली तर तिकीट रद्द केल्यानंतर पूर्वी अर्धीच रक्कम परत मिळायची. आता मात्र गाडी निघून गेल्यानंतर दोन तासांत तिकीट रद्द केल्यास तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार आहेत. फक्त ‘रिझर्व्हेशन चार्जेस’ त्यातून वगळले जातील. हा नवा बदल लवकरच रेल्वेच्या तिकीट बुकिंग सेवेत करण्यात येणार आहे. गाडी चुकल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात करणार होता त्या स्टेशनच्या मॅनेजरकडे जावे लागेल. त्यांच्याकडून तिकीट डिपॉझिट रिसिप्ट भरून जमा करावी लागेल.

Post Bottom Ad