शपथविधीवर शिवसेनेचा बहिष्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शपथविधीवर शिवसेनेचा बहिष्कार

Share This
शिवसेना-भाजपमध्ये राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिपदांवरून सुरू असलेला तिढा सुटल्याचे संकेत मिळत असतानाच, आता अचानक त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजपकडून चर्चेला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचा दावा करत शिवसेनेनं आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेलेले अनिल देसाई शपथ न घेताच माघारी परतले. 


त्यामुळे हे मित्र पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धुसर झाल्याचं बोललं जातंय. इतकंच नव्हे तर, केंद्र सरकारमधूनही शिवसेना बाहेर पडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी शिवसेनेच्या अनिल देसाईंचं दिल्लीला निघणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची फोनवरून दोनदा झालेली चर्चा, देसाई केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती, या सगळ्यांतून सेना-भाजपमधील समेटाचेच संकेत मिळत होते. परंतु, त्यानंतर कुठेतरी माशी शिंकली आणि सगळंच चित्र पालटलं.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages