'मोदी सरकार'च्या मंत्री मंडळाचा विस्तार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'मोदी सरकार'च्या मंत्री मंडळाचा विस्तार

Share This
'मोदी सरकार'च्या मंत्री मंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात २१ नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात महाराष्ट्रातील सुरेश प्रभू आणि हंसराज अहिर या दोघांच्या नावांचा समावेश होता. मात्र शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तारात सहभाग घेतला नाही.

भाजपला महाराष्ट्रातील विधानसभेत दमदार यश मिळाल्यानंतर दोन मराठी वीर मंत्रिमंडळ विस्तारात घेण्याचे ठरवले. सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रिपदाची तर हंसराज अहिर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते. 

मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पुढील प्रमाणे
केंद्रीय मंत्रिपद
१)मनोहर पर्रिकर
२)सुरेश प्रभू
३)जे. पी. नड्डा
४)वीरेंद्र सिंह चौधरी

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
५)बंडारू दत्तात्रय
६)राजीव प्रताप रुडी
७)डॉ. महेश शर्मा


राज्यमंत्री
८)मुख्तार अब्बास नक्वी
९)राम कृपाल यादव
१०)हरीभाई चौधरी
११)प्रा. सावरलाल जाट
१२)मोहनभाई कुंदरीया
१३)गिरीराज सिंह
१४)हंसराज अहिर
१५)प्रा. रामशंकर कठेरिया
१६)वाय. एस. चौधरी
१७)जयंत सिन्हा
१८)राज्यवर्धन सिंह राठोड
१९)बाबुल सुप्रियो
२०)साध्वी निरंजन ज्योती
२१)विजय सांपला

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages