जन्म - मृत्यू दाखलाही मोबाइलवर मिळावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जन्म - मृत्यू दाखलाही मोबाइलवर मिळावा

Share This
मुंबई- दुकानदारांना देण्यात येणारे परवाने, तसेच नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले ही सुविधाही मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून पीडीएफ पद्धतीत उपलब्ध करून दिल्यास, या प्रक्रियांना लागणारा वेळ तसेच पैशाचा अपव्यय टाळता येईल, असे मत भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त करून अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मुंबई पालिकेने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत जनतेला महापालिका कार्यालयात खेटा न मारता घरच्या घरी सहज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मालमत्ता कर व पाण्याची बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ई-गव्‍‌र्हनन्स कारभाराचा गाडा हाकणा-या मुंबई महापालिकेने मुंबईकरांना भ्रमणध्वनी अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे मालमत्ता कर आणि पाण्याची देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून दुकानदारांचे परवाने आणि नागरिकांना जन्म-मृत्यू दाखल्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages