मुंबई (प्रतिनिधी)- कुर्ला येथील क्रांती नगर रेल्वे कॉलनीमध्ये सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही मनुष्यहाणी झाली नसली तरी दहा झोपड्या जळून खाक झाल्या. आगीवर नऊ वाजता अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. दरम्यान, बीपीसीएल कंपनीच्या इंधन गळतीमुळे आग लागली माहीती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.
कुर्ला टर्मिनसच्या पूर्व भागातील क्रांती नगर रेल्वे कॉलनीत नाला आहे. नाल्यामध्ये बीपीसीएल कंपनीच्या इंधनवाहीनी गेली आहे. या वाहिनीला गळती लागल्याने इंधन गळती सुरु होती. हे इंधन नाल्यातील पाण्यात मिश्रीत झाल्याने तेलाचे तंवग आले होते. तसेच नाल्याची सफाई न केल्यामुळे साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. आगीने हाहा म्हणता उर्ग्र रुप धारण केले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन, ६ पाण्याच्या गाड्या, १ रुग्वाहिका, २ ईएमएस व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. याआगीत नाल्याशेजारील झोपड्यांनी पेट घेतला. तब्बल आठ ते दहा झोपड्या आगीच्या भक्ष झाल्या. यामध्ये झोपड्यांचे दरवाजे, तावदाने, खिडक्यां जळून खाक झाल्या. पंरतु, प्रसंगावधान राखत रहिवाशांनी घरातून सिलेंटर लांबविल्याने मनुष्यहाणी टळली असल्याचे आपत्कालीन विभागाने सांगितले. मात्र, आग कशामुळे याचे मुख्य कारण स्पष्ट झाले नाही.