एमएमआरडीएने २0१४ मध्ये ५९५५ कोटींचे प्रकल्प पूर्ण केले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमएमआरडीएने २0१४ मध्ये ५९५५ कोटींचे प्रकल्प पूर्ण केले

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २0१४ मध्ये ५९५५ कोटींचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.पुढील विकासासाठी ६९४२५ कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. मेट्रो, मोनोरेल, पूर्व मुक्त मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबरोबर आगामी काळात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो २, मेट्रो ३ या प्रकल्पांकडे एमएमआरडीएने लक्ष केंद्रित केले आहे. 

एमएमआरडीएच्या माध्यमातून ३३.५ किमी लांबीच्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून या प्रकल्पासाठी २४,३४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो २ साठी २५६0५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ साठी १९0९७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गाबरोबरच प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला जंक्शनवरील ४ उड्डाणपुलांसाठी २२७ कोटी रुपये आणि वांद्रे-कुर्ला-चुनाभट्टी १५६ कोटी रुपये हे दोन प्रकल्प मंजूर केले आहेत. 

मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्यासाठी अर्थात १0.२४ किमी लांबीचा वडाळा-संत गाडगे महाराज चौक मोनोमार्ग १२६0 कोटी रुपये आणि विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प २६00 कोटी रुपये असे २६00 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत २७५ किमी लांबीचे रस्ते, १४ उड्डाणपूल, ३ खाडी पूल आणि २ रस्ते ओलांडणी पूल बांधण्यात येत आहेत. प्राधिकरणाकडून २२ किमी लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ९६३0 कोटी रुपये आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग ९३२६ कोटी रुपये हे दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages