गृहनिर्माण सोसायट्यांची डीम्ड कन्व्हेअन्समधून सुटका होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृहनिर्माण सोसायट्यांची डीम्ड कन्व्हेअन्समधून सुटका होणार

Share This

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : डीम्ड कन्व्हेअन्सच्या लाभाबाबत सरकारी यंत्रणेमध्ये समन्वयाच्या कमतरतेमुळे तसेच संपूर्ण प्रक्रिया संभ्रमाने युक्त असल्याने मुंबईतील हजारो गृहनिर्माण सोसायटींना डीम्ड कन्व्हेअन्सचा लाभ प्राप्त होत नाही. या समस्येवर भाजपाचे वरिष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी डीम्ड कन्व्हेअन्सच्या प्रक्रिया सोप्या पद्धतीने करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. लोढा यांना आश्‍वासन दिले की, डीम्ड कन्व्हेअन्स संबंधात सर्व विभागांची एक मीटिंग बोलावून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.
मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने अशा इमारती आहेत की त्यांच्या जमिनी सोसायटींच्या नावावर हस्तांतरित झालेल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनात आ. लोढा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना याकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले होते की, मुंबईच्या ८0 टक्के गृहनिर्माण सोसायटींद्वारे सर्व प्रकारचे प्रयत्न करूनदेखील त्यांना डीम्ड कन्व्हेअन्सचा लाभ मिळालेला नाही. लाखो कुटुंबांशी निगडित असलेली ही समस्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडताना आमदार लोढा म्हणाले की, डीम्ड कन्व्हेअन्सबाबत महानगरपालिका, सोसायटी रजिस्ट्रार आणि मुद्रांक शुल्क विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो.

सोसायटींना कन्व्हेअन्स मिळवून देण्याकरिता आघाडी सरकारने कायदेशीर बाबी बनवून मोठय़ा प्रमाणात वाहवा मिळवली होती; परंतु या प्रक्रियेत महानगरपालिका, सोसायटी रजिस्ट्रार आणि मुद्रांक शुल्क विभागांनी अनेक अडचणी निर्माण केल्यामुळे लोकांना त्रास होत आहे. सरकारी विभागांमध्ये परस्पर समन्वयाच्या कमतरतेमुळे आजपर्यंत ५00 पेक्षा अधिक सोसायट्यांच्या जमिनी हस्तांतरित झालेल्या नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १ लाख हाऊसिंग सोसायट्यांचे कन्व्हेअन्स न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर अशीही माहिती मिळाली आहे की, महानगरपालिकेचे अधिकारी सहकार्य करत नाहीत, मुद्रांक शुल्क जास्त दाखवण्यात आले आहेत, अनेक बाबतीत नोंदणी निबंधकांची अडवणूक यामुळे लाखो मुंबईकर त्रासलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत आ. लोढा यांना आश्‍वासन दिले की लवकरात लवकर एक समिती नेमून समस्येचे निराकरण करण्यात येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages