ज्येष्ठांसाठी लवकरच नवीन हेल्पलाइन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठांसाठी लवकरच नवीन हेल्पलाइन

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणार्थ पोलीस लवकरच नवीन संकेतस्थळ तसेच हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करणार आहेत. ज्येष्ठांसाठी सध्या अस्तित्वात असलेले 'डब्ल्यूडब्ल्यूूडब्ल्यू.हमारीसुरक्षा.कॉम' हे संकेतस्थळ आणि १0९0 हा हेल्पलाइन क्रमांक बदलला जाणार आहे. या सुविधांतील विविध त्रुटी उजेडात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेणेही ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचे बनत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर नव्या वर्षात ज्येष्ठांसाठी १२९१ हा नवा हेल्पलाइन क्रमांक व नवे संकेतस्थळ कार्यान्वित केले जाणार आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचे संकेतस्थळ तसेच हेल्पलाइन क्रमांकाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. सध्याच्या संकेतस्थळावर जानेवारी २0१४ पर्यंत ३८ हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली. मात्र, त्यापैकी मोजक्याच ज्येष्ठांचा रेकॉर्ड पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबर २00९पासून ज्येष्ठांच्या नोंदणीला सुरुवात झाली. पोलिसांनी ज्येष्ठांच्या रेकॉर्डची देखभाल करण्यासाठी खाजगी यंत्रणेशी हातमिळवणी केली होती. नंतर त्या खाजगी यंत्रणेने पोलिसांना आपला सर्व्हर वापरण्यास नकार देत बहुतांश डेटा हटवला. दुसरीकडे, फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी १0९0 हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्या सुविधेत लहान मुले आणि महिलांनाही अंतभरूत करून घेण्यात आले. त्यामुळे या हेल्पलाइनवर भार वाढला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या क्रमांकाचा लाभ घेणे कठीण झाले. संबंधित केंद्रावर दिवसभरात शेकडो कॉल्स येतात. त्यातील केवळ दोन कॉल्स ज्येष्ठ नागरिकांचे असतात, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages