सीएसटी ते कल्याण प्रवासाच्या वेळेत बचत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएसटी ते कल्याण प्रवासाच्या वेळेत बचत

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या डीसी (डायरेक्ट करंट)-एसी (अल्टरनेट करंट) विद्युत रूपांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे सीएसटी ते कल्याण स्थानकांदरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. शनिवारी रात्री सीएसटी ते ठाणे स्थानकांदरम्यान डीसी-एसीची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. यापूर्वी ठाणे ते कल्याण स्थानकांच्या डीसी-एसी रूपांतरणाचे काम पूर्ण झाले आहे.
देशात सर्वत्र एसीवर लोकल-मेल-एक्स्प्रेस चालतात. फक्त मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी ते कल्याणपर्यंतच्या गाड्या डीसीवर चालत होत्या. त्यासाठी मरेने गेल्या वर्षी विशेष ब्लॉक घेऊन ठाणे-एलटीटी पाचवा, सहावा मार्ग, ठाणे ते कल्याणपर्यंतच्या एसी विद्युत परावर्तनाचे काम पूर्ण केले होते. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत सीएसटी ते ठाणे स्थानकांदरम्यानच्या डीसी-एसी विद्युत रूपांतरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे तपासणीसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. आता मध्य रेल्वेवर सीएसटी ते कल्याण स्थानकांदरम्यान एसीवर चालणार्‍याच लोकल धावू शकतात. एसीमुळे गाड्यांचा वेगही वाढण्यास मदत होणार असून परिणामी वेळेची बचत होणार आहे. परंतु त्यासाठी फक्त एसीवर चालणार्‍या लोकल गाड्याच चालवाव्या लागणार आहेत. सध्याच्या घडीला मरेवर डीसी-एसीवर चालणार्‍या गाड्यांची संख्या ६५ तर परेवर ४५ आहे.
मध्य रेल्वे फेर्‍या १६१८
मेन लाइन ८२५ फेर्‍या
१२ डब्यांच्या ८0९ फेर्‍या
१५ डब्यांच्या १६ फेर्‍या 
गाड्यांची संख्या ७५
डीसीवर चालणार्‍या १0
एसी-डीसीवर चालणार्‍या ६५

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages