अपंगांसाठी ( अस्थिव्यंग ) प्यारा पॉवर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अपंगांसाठी ( अस्थिव्यंग ) प्यारा पॉवर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) :  दि प्यारालिंपिक पॉवर लिफ्टिंग असोसीएशन, मुंबई ( रजि. ) या संस्थेच्या विद्यमाने मुंबईमध्ये अपंगांसाठी ( अस्थिव्यंग ) प्रथमच " प्यारा पॉवर लिफ्टिंग च्याम्पियनशीप - २०१५ " चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा अपंग( अस्थिव्यंग ) पुरुष आणि महिला यांच्यासाठी असून ४ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत संत गाडगेबाबा सभागृह, एस. व्ही. रोड, बांद्रा तलावा समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई येथे संपन्न होणार आहे. 

स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारयांनी अपंगांसाठी ( अस्थिव्यंग ) असल्याचे प्रमाणपत्र, रहिवाश्याचा पुरावा, २ फोटो घेवून स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद गुप्ता ९०२२७५७६४६, रमेश सरतापे ७३०३९८१३४५ किंवा भूषण कासेकर यांच्याशी ९८३३४१४८५८ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages