वाहतूक विभागाचे दुचाकीस्वारांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाहतूक विभागाचे दुचाकीस्वारांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास निमंत्रण देणार्‍या दुचाकीस्वारांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाने केला आहे. त्या अनुषंगाने या दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा वाहतूक विभागाचा विश्‍वास आहे.

वाहतूक विभागाने मे महिन्यात दुचाकीस्वारांविरोधात मोहीम हाती घेतली होती. यामध्ये पंधरवड्यातच जवळपास ४0 हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. २२ हजार दुचाकीस्वार विनाहेल्मेट, १७ हजार सिग्नल तोडणे, साडेसात हजार झेब्रा क्रॉस लाइनवर दुचाकी थांबणे आणि साडेतीन हजार दुचाकीस्वारांवर नो एण्ट्रीत प्रवेश करण्यावरून दंड ठोठावण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यात प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार वर्षभरात वेगाने वाहन चालवण्याचे ६ हजार, सिग्नल तोडण्याचे अडीच लाख, विना हेल्मेट वाहन चालवण्याचे २ लाख आणि झेब्रा क्रॉसवर दुचाकी थांबवण्याचे ८0 हजार दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंड देऊन आपली सुटका करून घेण्याची वृत्ती वाढत असल्यामुळे या कारवाईचा दुचाकीस्वारांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे समुपदेशनाचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वाहतुकीचे नियम, अपघात आणि त्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक परिणामांबाबत दृकश्राव्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages