५ जानेवारीपर्यंत बंदी आवाजी फटाक्यांवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2014

५ जानेवारीपर्यंत बंदी आवाजी फटाक्यांवर

मुंबई : शहरात १0५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणार्‍या फायर बलून्स आणि रॉकेट्स यासारख्या आवाजी फटाक्यांवर राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत बंदी लागू केली आहे. अशा प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन आणि विक्रीला मान्यता नाही तसेच पिवळा फॉस्फरस असलेल्या स्पार्कलर्सवरही बंदी लागू करण्यात आली आहे. 

या फटाक्यांतून बाहेर पडणारा वास लहान मुलांच्या आरोग्याला घातक असल्याने ही बंदी लागू केल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. शहरात आधीच ध्वनी प्रदूषणाची समस्या जटील बनत चालली आहे. त्यात आवाजी फटाके फोडणार्‍यांचे प्रमाणही अधिक असल्याने राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. याचअंतर्गत आवाजी फटाक्यांवर बंदी लागू केली आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार, नागरिक रस्ते किंवा हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात आवाजी फटाके फोडू शकत नाहीत. तसेच शांतता क्षेत्राच्या (सायलेन्स झोन) १00 मीटर परिसरात फटाके फोडण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दरवर्षाला अशी परिपत्रके जारी केली जातात, असे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. अनेक नागरिक उत्सव वा अन्य समारंभप्रसंगी असे फटाके फोडून जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात तसेच आवाज र्मयादेचे उल्लंघन करतात. ध्वनी र्मयादेचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलमांअन्वये आठ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे. तसेच १२५0 रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो, 
असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad