मुंबई पोलिसांना नॅसकॉम पुरस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पोलिसांना नॅसकॉम पुरस्कार

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) 
सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांसाठी पोलिसांना नॅसकॉम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मध्य प्रदेश आणि उत्तराखंड पोलिसांना पिछाडीवर टाकत मुंबई पोलिसांनी हा पुरस्कार पटकावला आहे. 


माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योग विश्‍वातील अग्रगण्य संस्था नॅसकॉम/ डीएसआयएसमार्फत हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त (तपास, गुन्हे शाखा) धनंजय कुलकर्णी यांनी नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांमार्फत राबवण्यात आलेल्या योजनांबाबत कुलकर्णी यांनी शुक्रवारी माहिती दिली. 'देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या सुरक्षा यंत्रणांपुढे सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान आहे. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी २000 साली विशेष कक्ष स्थापन केला,' असे त्यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages