मागासवर्गीय पदावर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मागासवर्गीय पदावर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील मागासवर्गीय प्राध्यापकांच्या पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. याबाबत म्युन्सिपल मजदूर संघाने अशा नियुक्तीचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांच्याकडे केली आहे. 

पालिका मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देत नाही, त्यामुळे कोणत्याही खात्याचा सह प्रमुख, उप प्रमुख किंवा प्रमुख होत नाही. प्रशासन नेहमी अहर्ताप्राप्त उमेदवार मिळत नाही असे कारण देत असते. यामुळे मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी अभियंते यां चे भारतीय राज्य घटनेने दिलेल्या घटनादत्त अधिकार काढून मागासवर्गीयांच्या रिक्त पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. असाच प्रकार वैद्यकीय महाविद्यालयात केला जात आहे. यामुळे मागासवर्गीयांची रिक्त पदे धोक्यात आणणारा प्रस्ताव फेटाळून लावावा अशी मागणी म्युन्सिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages