शनिवारी रात्री प्रवाशांच्या सोई साठी बेस्ट तर्फे ज्यादा बसगाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शनिवारी रात्री प्रवाशांच्या सोई साठी बेस्ट तर्फे ज्यादा बसगाड्या

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): मध्य रेल्वेवर येत्या शनिवारी मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मोठ्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई हद्दीपर्यंत बेस्ट उपक्रमातर्फे ज्यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. ह्या बसगाड्या मध्य रात्री धावणार असून फोर्ट ते मुलुंड दरम्यान धावणार आहेत. 
शनिवारी पहिल्यांदाच रेल्वे सीएस टी ते कल्याण दरम्यान एसी विद्युत प्रवाहावर धावणार आहे. त्यामुळे शनिवारी शेवटची रेल्वे रात्री १०वाजून ५० मिनिटांनी रवाना होणार आहे. ह्या चाचणीसाठी शनीवार २० डिसेंबर ते रविवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटा पर्यंत सिएस ती ते कल्याण दरम्यान एकही गाडी धावणार नाही . म्हणून प्रवाशांची गैरसोई टाळण्यासाठी बेस्ट तर्फे ७ लिमिटेड, ३६८ लिमिटेड २७, ३०२ ह्या बस मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. बस क्रमांक ०७ विक्रोळी आगार ते म्युझियम दरम्यान जादा बस सुटेल, तसेच बस क्रमांक २७ , ३०२ ,३६८ लिमिटेड ह्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.    

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages