वीजपुरवठा क्षेत्रातही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीजपुरवठा क्षेत्रातही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध होणार

Share This
नवी दिल्ली : मोबाइल, इन्शुरन्स पाठोपाठ आता ​वीजपुरवठा क्षेत्रातही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पाहिजे त्या कंपनीच्या वीजपुरवठा सेवेचा लाभ घेता येणार आहे.

'गेले काही दिवस इलेक्ट्रिसिटी अॅक्ट आमच्या विचाराधीन होता. त्यासंदर्भात आम्हाला बऱ्याच सूचनाही प्राप्त झाल्या,' अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली. वीजवितरण क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली आहे. या वाढत्या स्पर्धात्मकतेचा फायदा ग्राहकांना मिळावा, यासाठी आम्ही पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहोत. 

त्यामुळे ग्राहकांना चांगली, दर्जेदार आणि किफायती सेवा ​मिळविण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे देशाच्या दुर्गम भागातही वीजपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सुविधेमुळे एखाद्या सेवेमुळे त्रासलेल्या ग्राहकाला आवडीप्रमाणे नव्या कंपनीची सेवा मिळवणे सहज शक्य होणार आहे. महाराष्ट्रात अंशतः ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र काही कोर्टप्रकरणांमुळे त्यात खंड पडल्याचेही गोयल म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages