राज्यघटनेच्या वरती सुपर पॉवर बनविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2014

राज्यघटनेच्या वरती सुपर पॉवर बनविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू - आनंदराज आंबेडकर

मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्य घटना हाच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. गेली ६० वर्षे याच राज्यघटनेवर राज्य केले जात आहे. असे असताना केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी भगवत गितेला राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करावे असे वक्तव्य केले आहे. स्वराज यांनी केलेले वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. भारतीय राज्य घटनेच्या वर सुपर पॉवर म्हणून कोणता ग्रंथ आणण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

राज्यघटनेने सर्व जाती धर्मियांना आपल्या जाती धर्मा प्रमाणे वागण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात असे असताना एखाद्या जाती किंवा धर्माच्या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर केल्यास इतर धर्मीयांमध्ये असुरक्षित भावना निर्माण होऊन देशवासीयामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते असे आनंदराज यांनी  सांगितले. 

आपल्याच बाजूच्या देशामध्ये धर्मावर आधारित राज्यघटना स्वीकारली आहे यामुळे या देशाची दोन शकले झाली आहेत. असे असताना भारतामध्ये असा प्रयोग करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहे. विविध जाती धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाला असल्याने आपला देश अधोगतीकडे जाणार आहे. सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे आनंदराज यांनी सांगितले. 

Post Bottom Ad