म्हाडाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

Share This
म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात दक्षता अधिकारीपद गेली एक वर्ष रिक्त आहे. म्हाडाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दलालांचा वाढता सुळसुळाट, म्हाडातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर म्हाडाकडून दुर्लक्ष होत आहे. अत्यंत महत्त्वाचे असणारे दक्षता अधिकारीपद रिक्त आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजनकुमार सुधांशु यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. उपमुख्याधिकारी यांचे पद रिक्त आहे. त्यामुळे मुंबई मंडळाच्या माध्यमातून सोडतीसाठी राबविण्यात येणार्‍या अनेक प्रक्रिया रखडल्या आहेत.प्राधिकरणाच्या सचिवांवर सध्या दक्षता अधिकारी आणि सचिवांचा अतिरिक्त पदभार दिला आहे. सोडतीसाठी महत्त्वाचे ठरणारे पणन विभागातील अघिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.नवनियुक्त अधिकार्‍यांना सर्व प्रक्रिया समजून घेण्यास आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्यास एक ते दोन महिने जाणार आहे. 

अधिवेशनामुळे काही बदल्या रखडल्या असून यामुळे म्हाडाची कार्यपद्धती मंदावली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांच्यादेखील बदलीची चर्चा सुरू आहे. एकूणच म्हाडाचा कारभार धिम्या गतीने सुरू आहे. या सर्वांचा परिणाम म्हणूनच म्हाडाच्या माध्यमातून जून महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीचे सूचनापत्र पाठवण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. मुंबई मंडळाचा अतिरिक्त चार्ज कोकण मंडळाच्या मुख्याध्याकार्‍याकडे आहे. अनेक कामे रखडल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षात सदनिकेची प्रक्रिया वेग घेईल असे वाटत असताना या रखडलेल्या बदल्यांमुळे सूचना पत्रांची प्रक्रिया उशिराने सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages