आमदारांना मतदारसंघासाठी अतिरिक्त ५0 लाखांचा निधी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदारांना मतदारसंघासाठी अतिरिक्त ५0 लाखांचा निधी

Share This
मुंबई : वित्त आणि नियोजन खात्याने आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विधानसभा सदस्यांसाठी प्रत्येकी ५0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील शासन आदेश गुरुवारी जारी केला आहे.
राज्य सरकारने २0१४-१५ या वर्षात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; परंतु ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊन नवीन विधानसभा अस्तित्वात आल्याने आमदारांना मतदारसंघातील कामासाठी निधी उपलब्ध नव्हता. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. त्या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून ५0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी अतिरिक्त निधीचा सरकारी आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी ५0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तो येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages