मुंबई : उपनगरी रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्या एटीव्हीएमची सुविधा अधिक सोपी करण्याचे प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यामुळे प्रवाशांना एटीव्हीएमवरील तिकीट मिळण्याचा कालावधी आणखी काही सेकंदांनी कमी होणार आहे. नव्या पद्धतीत केवळ स्टेशनच्या नावावर क्लिक करताच तिकीट मिळणार आहे.
एटीव्हीएमवर तिकीट काढण्यासाठी जाणार्या प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी ५ पायर्यांचा वापर करावा लागतो. त्याऐवजी नव्या मशीनमध्ये केवळ तीन पायर्यांमध्ये तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या नव्या पद्धतीसाठी एटीव्हीएममध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार असून त्याचे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एटीव्हीएमच्या नव्या रुपात अप आणि डाऊन दोन प्रकारे स्क्रीन दिसण्याची संकल्पना आहे. त्यात एकच तिकीट दर असणार्या सर्व स्टेशनची यादी एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. अशा प्रकारे सात दरपत्रकांमध्ये सर्व स्टेशनची यादी समाविष्ट होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी एटीव्हीएमचे स्मार्टकार्ड मशीनवर ठेवताच फक्त इच्छुक स्टेशनवर क्लिक करावे लागणार असल्याचे आतापर्यंत तिकिटांसाठी लागणार्या वेळेत आणखीन बचत होणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय कर्मशिअल मॅनेजर डॉ. आलोक बडकुल यांनी दिली. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत ही पद्धत निर्दोष होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. नव्या एटीव्हीएम तंत्रात प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच जलद गतीने तिकीट मिळण्यावर भर देण्यात आला आहे. ही प्रणाली प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक परवानगी, निविदा आदी प्रक्रियेनंतरच कंपन्यांची निवड केली जाईल, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.