मुंबई विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा

Share This
मुंबई : दहशतवादी एअर इंडियाच्या काबूल-कोलकाता विमानाचे अपहरण करण्याच्या बेतात असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिल्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही 'हाय अँलर्ट' जारी करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी सतर्कता बाळगण्याच्या सूचना विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने मुंबईसह अन्य महानगरांतील विमानतळांवरही 'हाय अँलर्ट' जारी केला आहे. 'थर्टी फस्र्ट'च्या रात्रीपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी कारवायांचे सावट गडद बनले आहे. तेव्हापासून मुंबई पोलीस सतर्क राहिले असतानाच आता विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश दिले आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या इशार्‍याची गांभीर्याने दखल घेत विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा संशयास्पद वावरणार्‍या प्रवाशांची कसून चौकशी करत आहेत. विमानतळाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या 'वॉच बूथ' तसेच 'एण्ट्री पॉईण्ट्स'वर शस्त्रधारी जवानांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. टर्मिनल गेट्सच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची स्थिती तपासली जात आहे. या अँलर्टची शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनाही कल्पना देण्यात आली असून मुंबई पोलीस सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यादृष्टीने खबरदारी बाळगून असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. त्याचबरोबर शीघ्र कृती दल आणि फोर्स वनलाही सतर्क करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages