नवनिर्वाचित म्हाडा उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नवनिर्वाचित म्हाडा उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Share This
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या एस. एस. झेंडे यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सोमवारी पार पडलेल्या मुख्य अधिकार्‍यांच्या बैठकीत म्हाडाच्या योजनाचा, विविध कार्यपद्धतीचा आढावा या वेळेस झेंडे यांनी घेतला. 

म्हाडाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे यांनी काही वर्षांपूर्वी म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य अधिकारी म्हणून काम पाहिले होते, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. त्यांच्या या कामाचा म्हाडाच्या पुढील वाटचालीसाठी उपयोग होणार असून म्हाडाच्या विविध योजनांचा अभ्यास करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या माध्यमातून दरवर्षी सर्वसामान्यासाठी सोडत काढण्यात येते, त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना, भूखंड खरेदी विक्री, वसाहतींचा पुनर्विकास असे विविध प्रकल्प म्हाडासाठी महत्त्वाचे आहेत. म्हाडाच्या कारभारात अडथळा ठरणारे दलाल आणि भ्रष्टाचार यांचा सफाया करण्यासाठी ठोस पावले उचण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages