बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी डॉ. जगदीश पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी डॉ. जगदीश पाटील

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार ६ जानेवारी  रोजी डॉ. जगदीश पाटील यानी ओम प्रकाश गुप्ता यांच्याकडून स्विकारला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर येण्याआधी पाटील हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. पाटील यानी फलोद्यान या विषयात पिएचडी केली आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय उद्यानविद्या महासभेने त्यांच्या प्रबंधाची प्रशंसा केली आहे. पाटील यानी सोलापूरचे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास आयुक्त या पदांवर काम केले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages