इबोला साथीच्या प्रतिबंधासाठी पालिका तयार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इबोला साथीच्या प्रतिबंधासाठी पालिका तयार

Share This
मुंबई (प्रतिनिधी)- विविध साथरोगांच्या किंवा इबोला सारख्या महाभयंकर रोगाच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी महापालिका सदैव तयार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.


तसेच महापालिकेच्या जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये,चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये इबोला रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यातआला असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा खाटा आणि राज्य सरकारच्या जे.जेरुग्णालयातही व्यवस्थाकरण्यात ल्याचे देशमुख म्हणाले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत असणऱ्यासाथरोग नियंत्रण कक्षाद्वारे प्रसार-माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या इबोला विषाणूविषयक कार्यशाळे दरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉपद्मजा केसकर,लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.सुजाता बावेजाउप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉमंगला गोमारेमहाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवेतील सहाय्यक संचालक डॉ.बी.एस.कांबळे आणि डॉके.आरखरात आदी उपस्थित होते.

इबोला रुग्ण हाताळणीबाबत आणि इबोला विषाणूजन्य आजांराबाबत पालिकेने आरोग्य सेवा  वैद्यकियसेवेतील सुमारे एक हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहेइबोला विषाणू विषयक प्राथमिक माहितीचेसंगणकीय सादरीकरणाद्वारे केले. तसेच इबोला विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना  संसर्गरोखण्यासाठी काय काळजी घ्यावीयाची माहिती देखिल देण्यात आली. या कार्यशाळेत डॉक्टर्समेट्रन,परिचारिकावॉर्डबॉय यांच्यासह रुग्णवाहिकेच्या चालकांना देखील इबोला विषयक प्रशिक्षण देण्यात आले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages