तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल

Share This
भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शबद वगळून जाहिरात दिल्या बद्दल नरेंद्र मोदी व भाजपा सरकारचा रिपाई ( खरात ) पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. मोदी व आर. एस. एस. असे प्रकार जाणूनबुजून करत असले तरी आंबेडकरी जनता दुधखुळी राहिलेली नाही हे संघ परिवाराने लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात संघाला व मोदी यांच्या धोरणांना चपराक मारली आहे हे मोदी यांनी विसरत कामा नये. संघ परिवाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची एलर्जी आहे. अशा प्रकारची चूक भाजपा सरकारने परत केल्यास आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा रिपाई (खरात)चे सचिन खरात यांनी दिला आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages