मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव राखून ठेवला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव राखून ठेवला

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
भांडवली मुल्यावर आधारित करप्रणालीच्या आधारीत नियमामधील प्रस्तावीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव विरोधी पक्ष आणि सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या विरोधानंतर पालिका प्रशासनाला राखून ठेवावा लागणार आहे. मुंबई मधील नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने विरोधी पक्ष आणि भाजपा विरोध करणार हे लक्षात घेत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी या प्रस्तावाबाबत सादरीकरण करावे अशी मागणी करत प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली. 

भांडवली मुल्यावर आधारित करप्रणालीनुसार कर वसूल केल्यास मुंबईकर नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यावर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यानी पत्र देवून प्रस्तावाला विरोध केला होता. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यानीही मालमत्ता करात २० टक्के वाढ करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत प्रस्तावाला विरोध केला होता. 
मुंबई महानगर पालिकेची विविध ब्यांकांमधून ३९ हजार कोटींच्या मुदत ठेवी असून यामधून पालिकेला दरमहा ४५७ कोटी रुपये व्याज मिळत आहे. या पैश्यांमधून वाढीव खर्च करून २० टक्के मालमत्ता करामधे वाढ न करता प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा अशी मागणी केली. रेडी रेकनरवर १. २० टक्के दर आकाराने चुकीचे असल्याचे पिसाळ यानी सांगुन प्रस्तावाला विरोध केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages