आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्यावर पालिकेचा अनधिकृत हातोडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्यावर पालिकेचा अनधिकृत हातोडा

Share This
नोटीस न देता पालिकेने केली कारवाई 
आंबेडकरी जनतेत संतापाची लाट 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहाची इमारत पालिकेने राहत्या विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता सोमवारी तोडण्यास सुरुवात केली. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी या तोडक कारवाईचे नेतृत्व करताना न्यायालयाच्या आदेशाने हि कारवाई होत असली तरी कोणतेही आदेश दाखवण्यास टाळाटाळ करत सिद्धार्थ वसतिगृहावर कारवाई केल्याने आंबेडकरी जनतेत आणि राहत्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सिद्धार्थ विहार वसतिगृह १९६४ साली सुरु करण्यात आले होते. या वसतिगृहाचे तत्कालीन केंद्रीय मंत्री छगाला यांनी या वसतिगृहाचे उद्घाटन केले होते. हे वसतिगृह मधल्या काळात दलित प्यान्थर आणि रिपब्लिकन चळवळीचे बालेकिल्ला झाले. याच वसतिगृहातून रिपब्लिकन चळवळीतील अनेक नेते कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. १९८५ - ९० च्या काळात या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद केले असले तरी आजही या वसतिगृहात वर्धा, नागपूर, जळगाव, सांगली, सातारा अश्या अख्या महाराष्ट्रातून बीकॉम, बी ए, पीएचडी, लॉ चे शिक्षण घेणारे तब्बल ९० विद्यार्थी आणि ५० रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते, बुद्ध विहारातील भन्ते या ठिकाणी राहत आहेत. १९६४ पासून पीपल्स एजुकेशन सोसायटीने या वसतिगृहाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले असल्याने या इमारतीला पालिकेने धोकादायक ठरवले होते. पालिकेने या इमारतीचे पाणी आणि विजेचे बिल भरले नसल्याने दोन महिन्यापूर्वीच वीज आणि पाणी कापले आहे. 

पालिकेने या इमारतीला एप्रिल २०१४ मध्ये धोकादायक ठरवत नोटीस दिली होती. पालिकेने कारवाई करताना साबंधीताना नोटीस द्यावी लागते अशी कोणतीही नोटीस न देता पालिकेने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. सोमवारी केलेल्या कारवाई मध्ये सर्व राहत्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना इमारतीमधून जबरदस्ती बाहेर काढण्यात आले. इमारतीच्या दरवाजे खिडक्या तोडण्यात आल्या. आणि विद्यार्थ्याचे सामान बाहेर काढून टाकण्यात आले. पालिकेने नियमानुसार कोणतीही नोटीस न देता अचानक केलेल्या कारवाई मुळे राहत्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने वसतिगृह खाली केल्याने आता विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षण कसे पूर्ण करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिद्धार्थ विहारात एक बुद्ध विहार आहे यामध्ये भन्तेजी राहत आहेत. याक बुद्ध विहाराचेही अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. वसतिगृहावर कारवाई सुरु असताना याच वसतिगृहातून शिकून पुढे गेलेले आणि नेते बनलेले समाजातील नेत्यांनीही पाठ फिरवल्याने आंबेडकरी जनतेत आणि विद्यार्थ्यांच्या संतापात वाढ झाली आहे. 

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार याच जागेवर अनेक नेत्यांचे डोळे लागले आहेत. वसतिगृहाच्या जागेवर अनेक झोपडपट्ट्या अनधिकृत रित्या बांधण्यात आल्या आहेत. इथे एसआरए प्रकल्प राबवले जात असून विकासकांना हि जागा बळकावयाची असल्याने सदर जागा खाली करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या वसतिगृहावर कारवाई करताना पालिकेने वसतिगृहाचा कारभार बघणाऱ्या पीपल्स एजुकेशन सोसायटीलाही विश्वासात घेतले नसल्याने या आरोपामध्ये भर पडली आहे. पालिकेच्या या कारवाई दरम्यान गिरीष नावाच्या एका विद्यार्थी बेशुध्द झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 
Displaying IMG-20150209-WA0034.jpg
Displaying IMG-20150209-WA0028.jpg
Displaying IMG-20150209-WA0040.jpg



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages