पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बायो टॉयलेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बायो टॉयलेट

Share This
मुंबई : रेल्वेला पर्यावरप्रेमी बनवण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात येत आहे. सध्याच्या घडीला ४३८ कोचेसमध्ये हे टॉयलेट बसविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शीतखंड असलेल्या अंटाक्र्टिकातील बॅक्टेरिया मानवी मलमूत्राचे विघटन करत आहे. रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या आरडीआयने या कामी मोलाचे काम केले आहे.

रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी स्थानक येताच मलमूत्र विसर्जन करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ऐनरेल्वे स्थानकात दुर्गंधी पसरते. याबाबत प्रवाशांना वारंवार आवाहन करूनही कोणताही फरक पडला नव्हता. तसेच धावत्या पॅसेंजर एक्स्प्रेसमधून पडणारे मलमूत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोटॉयलेटमध्ये मानवी मल विशेष अशा टँकमध्ये जमा केला जातो. त्यांनतर अंटाक्र्टिकातून आयात केलेजे बॅक्टेरिया या मलाचे विघटन करतात. या प्रक्रियेत मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड वायूने निघून जातो. बायोटॉयलेटमधील पाणी क्लोरिनेशननंतर सोडण्यात येते. मध्य रेल्वेच्या १११ कोचेसमध्ये बायोटॉयलेट बसवण्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झाल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. पश्‍चिम रेल्वेच्या १७९ कोचेसमध्ये बायोटॉयलेट बसवण्यासाठी साडेतीन कोटी मंजूर झाले आहे. आगामी काळात नव्या पॅसेंजर एक्स्प्रेसची निर्मिती करतानाच बायोटॉयलेट तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages