वरळी येथील उच्चभ्रू वसाहतीतील 'शुभदा' आणि 'सुखदा'मध्ये बांधलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने मंगळवारी हातोडा चालवून त्यांनी उभारलेल्या साम्राज्याचा 'धुव्वा' उडवला. बेकायदेशीर बांधकामांमुळे वादग्रस्त ठरलेल्या 'शुभदा' आणि 'सुखदा'वर कारवाई सुरू असताना, एकाही नेत्याने विरोध न केल्यामुळे पालिकेच्या पथकाला तोडकाम शांततेत करता आले. मात्र एका माजी मंत्र्यांच्या बांधकामाविषयीचे प्रकरण राज्याच्या नगर विकास विभागाकडे निर्णयाविना प्रलंबित असल्याने, त्यांचे बांधकाम पाडले गेले नाही. ही कारवाई होताना कडाडून विरोध होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर आणि सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी सव्वाबारा वाजता ही कारवाई सुरु झाली. या वेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ४0 कर्मचारी, या विभागाच्या तीन गाड्या आणि ४0 पोलीस तैनात होते. पालिकेच्या पथकाने 'शुभदा'तील तळ मजल्यावरील चार गाळे आणि पहिल्या मजल्यावरील पाच गाळ्यांतील अंतर्गत बांधकामे पाडली आणि दोन गाळे जमीनदोस्त केले. हे दोन गाळे तोडताना हातोडा आणि ड्रील मशीनचा वापर केला.
येथील एकूण ११ फ्लॅटवर कारवाई करण्यात आली. यात सात निवासी फ्लॅट व चार दुकाने आहेत. सात निवासी फ्लॅटचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आल्याचे आढळले. या फ्लॅटचा वापर 'कार्यालय' म्हणून करण्यात येत होता, तर दुकानांचेही रूपांतर कार्यालयात करून या गाळ्यांत बेकायदा बांधकाम केले होते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केल्याची माहिती उबाळे यांनी दिली. 'शुभदा' सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर पाच गाळे बांधून, त्यांच्या बाजूला गच्चीसाठी जागा ठेवल्याचे आराखड्यात मंजूर केले होते. मात्र गच्चीवरच रजनी पाटील आणि अशोक पाटील यांनी दोन गाळे बांधून अतिक्रमण केले होते. त्यामुळे हे दोन गाळे पाडल्याची माहिती जी-दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी. शेलार यांनी दिली.
कारवाई
रजनी पाटील आणि अशोक पाटील यांचे कार्यालय तोडले.
तळमजला : प्रतापसिंह पाटील, सलिल देशमुख, रणजित देशमुख, मृदुला चक्रवर्ती, शिवराज पाटील चाकूरकर.
पहिला मजला : धर्माजी सोनावणे, अविनाश पाटील, शांतीलाल जैन, रवींद्र सकपाळ, हेदनराव वाघये आणि दौलतराव अहिर.