स्वाइन फ्लूचे टेंशन नको - पालिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाइन फ्लूचे टेंशन नको - पालिका

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई मधे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढ़लत असले तरी शासनाकडून १० हजार गोल्या आणि सिरप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालिका रुग्नालयात स्वाइन फ्लूच्या रुग्नासाठी पालिका रुग्नालयात सर्व सुविधा देण्यात येत असल्याने नगरिकानी घाबरून जाऊ नए असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यानी केले. ते पालिका सभागृहात स्वाइन फ्लू बाबत नगरसेविका शितल म्हात्रे यानी विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना बोलत होते. 
मुंबई मधे १९ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत एकूण ४२ रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी २०  मुंबई शहरातील तर २२ मुंबई बाहेरील रुग्ण आहेत. शहरातील २ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. ६ रुग्ण ओपीडी मधे उपचार घेत आहेत तर ६ रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्याना घरी पाठवन्यात आले आहेत.मुंबई बाहेरील ६ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. १० रुग्ण ओपीडी पढ़े उपचार घेत आहेत तर २ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. ४२ पैकी ५ रुग्नांचा मृत्यु झाल्याचे देशमुख यानी सांगितले. पालिका बेस्ट बस वर आणि वर्तमान पत्रात जाहिराती देवून जनजागृती करणार असल्याची माहिती देशमुख यानी दिली.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages