दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाईन प्रवेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाईन प्रवेश

Share This
मुंबई – शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यास सलग तीन वर्षे अपयशी ठरलेल्या शिक्षण विभागाची प्रवेशप्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जासाठीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी दिली. 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र विभागात या प्रवेशासाठी खासगी शाळांची संख्या आठशेहून अधिक असून पालिका शिक्षण विभागाने यासाठी केवळ २८० शाळाच निश्चित केल्या आहेत. या शाळांतील सहा हजार ५०० जागांवरच प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे.
खासगी शाळांत राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने महापालिका शिक्षण विभागावर जबाबदारी सोपवली असून यंदाही हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी विभागाने निश्चित केलेल्या शाळांसाठी ऑनलाईन प्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
ही नोंदणी २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जासाठीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी दिली. राखीव जागांवरील प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी पालिका शिक्षण विभाग दोन वर्षापासून अपयशी ठरत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून यंदा प्रवेशासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी स्वत: प्राथमिक शिक्षण संचालक महावीर मानेंसह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला असून पहिल्यांदाच महापालिकेच्या २४ वार्डात प्रवेशासाठी एक केंद्र कार्यरत ठेवण्यात येणार आहे. यात एक शिक्षण विभागातील अधिकारी व खासगी शाळांतील कर्मचारी, शिक्षक असतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages