रेल्वे पोलिसांची नवी हेल्पलाईन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे पोलिसांची नवी हेल्पलाईन

Share This
मुंबई - रेल्वेने प्रवास करताना एखादी अडचण आली आणि रेल्वे पोलिसांची मदत घ्यायची असल्यास किंवा एखादी गोष्ट रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यायची असल्यास रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांच्या मदतीकरिता नवीन चार आकडी हेल्पलाईन सेवा करण्यात येणार आहे. १५१२ ही चार आकडी सेवा येत्या २२ ते २४ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांकरिता उपलब्ध केली जाईल, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे ही सेवा संपूर्ण देशभरात कार्यरत राहणार आहे.सध्या रेल्वे पोलिसांची ९८३३३३११११ ही दहा अंकी सेवा कार्यरत आहे. मात्र संकटकाळी रेल्वेची हेल्पलाईन आठवणे कठीण जाते. तर काही वेळा मोबाईल नेटवर्कबाबत अडचणी येत असल्याने पोलिसांनाही मदत पुरवण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages