मुंबई : रविवार, १ फेब्रुवारीपासून बेस्ट प्रशासनाने एक रुपयाची वाढ प्रवाशांच्या माथी मारल्यामुळे सुट्या पैशावरून बेस्ट वाहक व प्रवाशांमध्ये संघर्ष होऊ लागला आहे. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी एक रुपयाची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे सहा रुपयांची तिकीट सात रुपये झाली. त्यामुळे प्रत्येक प्रवासी दहा रुपयांची नोट वाहकापुढे करतो; पण तीन रुपयांची चिल्लर आपल्याकडे देण्यासाठी नसल्याचे सांगून वाहकच प्रवाशांकडे दोन रुपयांची मागणी करतो. त्यातून प्रवासी व वाहक यांच्यामध्ये संघर्ष उद्भवू लागला असल्याचे सांगण्यात आले. काही वेळा तर चक्क हाणामारीपर्यंत मजल जाते.
डेपोमधून बस बाहेर काढताना प्रत्येक बेस्ट बसच्या वाहकाकडे शंभर रुपयांची चिल्लर दिली जाते; पण ही चिल्लर काही वेळेतच संपत असल्याने प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पूर्वी दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी सहा रुपयाचे भाडे आकारले जात होते. त्या वेळी प्रवासी दहा रुपयांच्या नोटेसमवेत एक रुपयाचे नाणे वाहकाला देऊन सहकार्य करत असे; पण आता सहा रुपयांचे भाडे सात रुपये झाल्यामुळे दोन रुपये झाल्यामुळे प्रत्येकवेळी दोन रुपयाचे नाणे कोठून आणायचे? असा सवाल प्रवासीवर्ग करत आहे. बेस्ट बसमधून रोज १५ ते २0 लाख प्रवासी प्रवास करतात. भाडेवाढ करण्यापूर्वी बेस्ट प्रशासनाने सुट्या पैशाचा प्रश्न सोडवणे गरजेचे होते.
पाच रुपयांची नाणी बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत; पण एक व दोन रुपयांच्या नाण्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. बेस्ट प्रशासनाला रिझर्व्ह बँकेकडून सुट्या नाण्यांचा मुबलक पुरवठा होत असताना सुट्या पैशाची चणचण का वाटते? हाच प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे. काही वाहक व हॉटेल मालकांचे लागेबंध असल्याने बेस्टला सुट्या पैशाची चणचण वाटू लागली असल्याचे बोलले जाते. रोज होणारा वाहक व प्रवासी यांचा संघर्ष टाळण्यासाठी एक तर बेस्टने सुट्या पैशांचा मुबलक पुरवठा वाहकांना करावा, अन्यथा भाडेवाढ मागे घ्यावी, अशी संतप्त मागणी प्रवासी वर्गाकडून होऊ लागली आहे.