बेस्ट कर्मचारयांना कामाच्या ठिकाणाजवळ निवासस्थाने मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट कर्मचारयांना कामाच्या ठिकाणाजवळ निवासस्थाने मिळणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट कर्मचारी मुंबई बाहेर राहत असल्याने बेस्टच्या प्रवर्तनावर याचा परिणाम दिसू लागला आहे. बेस्टचे प्रवर्तन चांगले ठेवण्यासाठी आणि प्रवाश्याना चांगली सुविधा देण्यासाठी बेस्टच्या कर्मचार्याना मुंबई मधेच सेवा निवासस्थाने बनवून देण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकिमधे घेण्यात आला आहे. 

बेस्टच्या जोगेश्वरी मजासवाडी येथील दोन इमारती मोडीत काढण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकिमधे आला होता. याबाबत बोलताना बेस्टचे १० हजार कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. हे कर्मचारी मुंबई बाहेरून येत असल्याने कित्तेक वेळा उशिरा येत असतात. यामुले बस सेवेवर परिणाम होत आहे. बेस्टच्या कर्मचारयाना मुंबईमधे डेपो जवळ निवासस्थान दिल्यास बेस्टची सुविधा सुधारू शकते असे सांगत बेस्टची आणिक डेपो जवलील ४० एकर जागा अशीच पडून आहे याचा वापर सेवानिवासस्थाने बनवन्यासाठी करावा अशी मागणी सुनील गणाचार्य यानी केली. 

शिवजी सिंह यानी बेस्टला म्हाडाने १५ करोड़ मधे १०२७ निवासस्थाने बांधून दिली होती. म्हाडाकडून एलआयजी मधून घरे बांधून घेतल्यास केंद्र व राज्य सरकार कडून सबसिडी मिलेल. बेस्टने आपले ६ भूखंड विकले यापैकी एका भूखंडाचे पैसे खर्च करून सेवा निवासस्थाने बांधता आली असती याचा विचार बेस्ट समितीने करायला हवा असे सांगितले. तर केदार होंबालकर यानी बेस्टचे किती भूखंड पडून आहेत याची यादी समिती समोर सादर करावी अशी मागणी केली. बेस्टचे भूखंड डेपो म्हणून आरक्षित असल्याने त्याचे आरक्षण बदलन्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वच समिती सदस्यानी केली. यावर समिती अध्यक्ष दुधवडकर यानी कर्मचार्याना पुन्हा मुंबई मधे अनन्यासाठी कर्मचार्याना कामाच्या ठिकाना जवळ सेवा निवासस्थाने बांधान्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन बेस्ट समिती मधे दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages