जवखेडे हत्याकांड - चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा - हायकोर्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जवखेडे हत्याकांड - चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा - हायकोर्ट

Share This
मुंबई : संपूर्ण राज्यात खळबळ माजवणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे तिहेरी दलित हत्याकांडाची अन्य राज्यांतील तपास अधिकार्‍यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापून चौकशी करा, अशा मागणी करणार्‍या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली. याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला. 


स्कॉलर असोसिएशन बुद्धिस्ट(सब)चे आनंद कदम आणि प्रतीक कांबळे यांच्या वतीने डॉ. अँड़ गुणरतन सदावर्ते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. हे प्रकरण गंभीर असून राज्यातील अधिकार्‍यांचे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अन्य राज्यांतील अधिकार्‍यांचे विशेष पथक स्थापन करून चौकशी करावी. तसेच जवखेडेच्या पोलीस पाटलांसह स्थानिक पोलीस तपास अधिकार्‍यांची नार्को चाचणी घेण्याचे आदेश द्या, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

जवखेडे हे औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येत असताना याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर का दाखल करण्यात आली? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला असता या प्रकरणाचे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटल्याने याचिका उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात दाखल करण्यात आल्याचे अँड़ सदावर्ते यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages