मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी या समितीच्या बैठकिना उपस्थित रहात नसल्याने त्यांची हकाल पट्टी करावी अशी मागणी करत शिक्षण समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
पालिकेच्या शिक्षण विभागाचे सन 2015-16 चे 2500 कोटी रुपयांचे बजेट सादर करण्यात आले आहे. या बजेट बाबत शिक्षण समिती मधे चर्चा सुरु आहे. या बैठकीला शिक्षण अधिकारी शाम्भवी जोगी या अनुपस्थित राहिल्या. या आधीही कित्तेक बैठकिना जोगी या अनुपस्थित राहिल्या होत्या. काही दिवसा पूर्वी जोगी यानि उप शिक्षण अधिकारी याना बैठकिना समिति अध्यक्षाना बोलाव्ल्याने मेमो दिला होता. या प्रकरणी जोगी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा जोगी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने समिती सदस्यानी संताप व्यक्त करत बैठक स्थगित करण्याची मागणी केली. यावर समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी जोगी यानि पालिका उप आयुक्त याना येणार नसल्याचे सांगितले असले तरी अध्यक्ष म्हणून मला सुद्धा येणार नसल्याचे सांगायला हवे होते असे सांगत शिक्षण समितीची बैठक स्थगित केली.
