नवी दिल्ली : मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या महानगरांच्या महापौरांना लाल दिव्याचे वाहन देण्याची आग्रही मागणी एनडीए सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारकडे रविवारी केली आहे. केवळ नऊ घटनात्मक पदे धारण करणार्यांनाच लाल दिवा देण्याच्या हालचाली कें द्र सरकारने सुरू केल्या आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि सरन्यायाधीश या केंद्रीय पातळीवरील व्यक्तींना लाल दिव्याची गाडी देण्याबद्दल परिवहन मंत्रालय विचार करत आहे. याच वेळी राज्यपातळीवर मुख्यमंत्री, विधानसभा सभापती, मुख्य न्यायाधीश आदींना लाल दिवा देण्याचा केंद्राचा विचार आहे. लाल दिव्याच्या वाहनांचा गैरवापर वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर केंद्र सरकार यात कपात करण्याचा विचार करत आहे.
शिवसेनेने या भूमिकेचे स्वागत करत लाल दिव्यासाठीचा राजकीय संघर्ष संपुष्टात येईल, असे म्हटले आहे; परंतु याच वेळी मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी महानगरांच्या महापौरांना लाल दिवा देण्याचा आग्रह शिवसेनेचा आहे. ही शहरे आंतरराष्ट्रीय असल्याचा सेनेचा युक्तिवाद आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांच्यासह एकूण ३४ मान्यवरांना लाल दिव्याचे वाहन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात महापौरांना मात्र वगळले होते. शिवसेना आशियातील सर्वात धनाढय़ शहर असलेल्या मुंबईचे नेतृत्व करते. मुंबई महापालिकेत सेनेची सत्ता आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौराला लाल दिवा देण्याचा सेनेचा आग्रह आहे.