मुंबई महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेला विकास आराखडा हा मुंबईच्या विकासासाठी नसून भकासासाठी असल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. विकास आराखड्यामध्ये मुंबईकरांच हित दिसत नसल्याने या आराखड्याला आगामी काळात या विकास आराखड्याला जोरदार विरोध करणार करणार असल्याचंही निरुपम म्हणाले. शिवसेना सत्तेत असून विरोध जरी करत असली तरीही त्यांचा विरोध हा खोटा आहे, सेनेला सत्तेत असुन विरोध का करावा लागतोय शिवेसेना इतकी लाचार झालीये का असा प्रश्नही निरुपम यांनी शिवसेनेला विचारलाय.
मुंबई आराखडा “ विकास की विनाश ” या विषयावर मुंबई कॉग्रेसच्या वतीनं एका खुल्या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, या परिसंवादामध्ये मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, सामाजिक कार्यकर्त्या आणि अभिनेत्री शबाना आझमी आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपली मतं मांडली. विकास आराखडा हाप्रामुख्याने मुंबईकरांच्या जीवनशैलीशी निगडीत असावा या मुद्यावर सर्वांनी भर दिला.
मुंबई शहराच्या विकासाठी आखण्यात आलेला आराखडा हा नागरिकांच्या सोयीचा असावा जेणेंकरून दैनंदिन आयुष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, यासाठी सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात यावे. महापालिकेने तयार करण्याल आलेला विकास आराखडा सर्वसामान्य नागरीकांना समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत असावा अशी मागणी शबान आजमी यांनी केली.
विकास आराखड्यात हा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून तयार केलेला असावा अशी एक भावना असते मात्र मुंबई महापालिकेचा विकास आराखडा हा बिल्डर धार्जीणा असुन यात सर्वसामान्य माणसाचे अहित जपलं असल्याचा आरोप माजी खासदार प्रिया दत्त यांनी केला.
विकास आरख़डा म्हणजे फक्त आणि फक्त टोलेजंग टॉवर्स बांधणं नाही तर सर्व सामान्य माणसाला परवडणारी घरं, त्यांच्या बजेट मध्यल्या आरोग्य सुविधा आणि परवडणारं शिक्षण यांचाही विचार व्हायला हवा असं मतं प्रसिध्द आर्कीटेक्ट पी के दास यांनी व्यक्त केलं.
जेष्ठ नगररचनाकार रमेश प्रभू यांच्या मते हा दर 20 वर्षांनी विकास आराखडा तयार व्हायला हवा मात्र पहिला विकास आराखडा हा 1967ला तयार करण्य़ात आला होता दुसरा आराखडा हा 1991 मध्ये करण्यात होता आणि सध्या सादर करण्यात येत असलेला विकास आराखडा 2011 मध्येच तयार व्हायला हवा होता मात्र या विकास आराखड्याला 4 वर्षे उशीर झाला असल्याने आताच्या विकास आराखड्य़ात किमान पुढच्या काही वर्ष लक्षात घेवुन त्यातचं प्रारुप ठरवावं असं मत प्रभू यांनी व्यक्त केलं.
परीसंवादात सहभागी झालेल्या प्रत्येकाने हा विकास आराखडा कसा चुकीचा आहे यावर आपलं मत व्यक्त करतानाच या विकास आराखड्यात सर्वसामान्य नागरीकांचा विचार करुन या आराखड्याचं प्रारुप पुन्हा नव्याने तयार करावं अशी मागणी केलीये. त्यांमुळे या विकास आराखड्य़ाच्या विरोधात जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशाराही संजय निरुपम यांनी दिलाय...